विराट-अनुष्काने दिले मोदींना रिसेप्शनचे आमंत्रण

0

नुकतेच लग्नाच्या बंधनात अडकलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. विराट आणि अनुष्काने त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी मोदींची भेट घेऊन आमंत्रित केले.

यावेळी त्यांनी मोदींना रिसेप्शन कार्डदेखील दिले. याविषयीची माहिती पंतप्रधान मोदी यांच्या ट्वीटरवरून देण्यात आली आहे. मोदींच्या ट्वीटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये मोदी यांच्यासोबत विराट आणि अनुष्का दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन आहे, कि ‘भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी संध्याकाळी भेटले. मोदींनी दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.’

विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाचे आज अर्थात २१ डिसेंबरला दिल्लीमध्ये होणार असल्याचे सांगितले जाते. विराट आणि अनुष्का दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरात रिसेप्शन देणार असल्याचे कळते. मुंबईला येत्या २६ डिसेंबरला रिसेप्शन आयोजित केल्याचे सांगितले जाते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.