विद्या बालन झळकणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत !

0

अभिनेत्री विद्या बालन लवकरच एक राजकारणी महिलेच्या भूमिकेत झळकणार आहे. देशाची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेष्ठ पत्रकार सागरिका घोष यांच्या ‘इंदिरा, इंडियाज मोस्ट पावरफुल पीएम’ पुस्तकावर आधारित चित्रपट बनवण्यासाठी सिद्धार्थ रॉय-कपूर यांनी पुस्तकाचे अधिकार खरेदी केले आहेत. सिद्धार्थ रॉय-कपूर हे विद्या बालनचे पती आहेत. या सर्व घडामोडींनुसार, मोठ्या पडद्यावर विद्या बालन इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसू शकते अशी चर्चा सुरू आहे.

सागरिका घोष यांनी ट्विट करून सांगितले की, ‘इंदिरा, इंडियाज मोस्ट पावरफुल पीएम’ माझ्या या पुस्तकाचे सिद्धार्थ रॉय कपूर प्रोडक्शनसोबत करार झाला आहे. या पुस्तकाच्या आधारे साकारण्यात येणा-या चित्रपटात विद्या बालन इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. याबाबत मी फार उत्सुक आहे.

या ट्विटवरुन सागरिका यांनी विद्या बालन इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचे दिसत आहे. तसेच विद्या बालनच इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी योग्य असून अक्षय कुमारदेखील फिरोज गांधी यांच्याप्रमाणे दिसत असल्याचे ट्विटदेखील सागरिका यांनी केले आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.