विजय माल्या तिस-यांदा चढणार बोहल्यावर, पिंकी लालवानीशी करणार लग्न !

0

सुमारे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर पसार झालेला बिझनेसमन विजय माल्या वयाच्या 62 व्या वर्षी तिस-यांदा बोहल्यावर चढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माल्या किंगफिशर एअरलाइनची माजी हॉस्टेस पिंकी लालवानीसह साताजन्माची गाठ बांधणार आहे. पिंकी 2016मध्ये माल्यासोबत देश सोडून लंडनला गेली होती, तेव्हापासून ती माल्यासोबत तिथेच राहत आहे.

माल्या आणि पिंकी लालवानी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. अलीकडेच दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपचा तिसरा वाढदिवस साजरा केला होता.

माल्याचे तिसरे लग्न –

माल्याने पहिले लग्न एअर इंडियाची एअर हॉस्टेस समीरा त्याबजीसोबत केले होते. सिद्धार्थ माल्या, विजय माल्या आणि समीराचा मुलगा आहे. काही वर्षांतच दोघे वेगळे झाले. 1993 मध्ये माल्याने बालपणीची मैत्रीण रेखासोबत लग्न केले. रेखाचे हे तिसरे लग्न होते. रेखाला पहिल्या दोन लग्नापासून कबीर आणि लैला ही दोन अपत्य आहेत. लग्नानंतर माल्याने मुलीच्या रुपात लैलाला दत्तक घेतले होते. माल्या आणि रेखा यांना लिएना आणि तान्या या दोन मुली आहेत. रेखा आजही माल्याची अधिकृत पत्नी आहे.

बँकांची फसवणूक करून पसार झाला माल्या –

माल्या तब्बल 17 बँकांचे 9 हजार कोटी रुपये कर्ज बुडवून परदेशात पसार झाला आहे. गेल्या वर्षी माल्याला फरार असल्याचे घोषित केले होते. भारत सरकार माल्याला भारतात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. मागील वर्षी एप्रिल महिन्यात त्याचा पासपोर्टदेखील रद्द करण्यात आला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.