वादात अडकलेल्या मोहम्मद शमीला धोनीने दिला पाठींबा

0

पत्नीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीला माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने पाठींबा दिला आहे. शमी एक चांगला स्वभाव असलेला माणूस आहे, अशी व्यक्ती पत्नी किंवा देशाला कधीच धोका देऊ शकत नाहीत. अशी प्रतिक्रिया देऊन धोनी शमीच्या पाठीशी उभा राहीला आहे.

धोनी म्हणाला, ‘त्यांचे हे कौटुंबिक प्रकरण आहे. शमीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. शमी हा एका चांगला माणूस आहे’ असे म्हणून धोनीने शमीबाबत जास्त बोलण्यास नकार दिला. यापूर्वी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतन चौहाननेही शमीचे समर्थन केले होते. ‘बीसीसीआयने मोहम्मद शमीचा करार थांबवू नये, या प्रकरणाचा क्रिकेटशी काहीही संबंध नाहीये. त्याच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीये.’ असे चौहानने म्हणाले होते.

काय आहे नेमके प्रकरण…?

पत्नी हसीन जहांने शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच तिने शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले होते. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला होता. त्यांनतर तिने शमीची दक्षिण आफ्रिकेमध्येही एक गर्लफ्रेंड असल्याचा दावा केला आहे.

कोलकात्यातील लाल बाजार पोलिसात मोहम्मद शमीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शमी आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. शमीने पाकिस्तानी तरुणीकडून पैसे घेऊन मॅच फिक्सिंग केल्याची शंका हसीन जहांने व्यक्त केली होती.

हसीनाचे दुसरे लग्न…

२७ वर्षीय मोहम्मद शमीचे लग्न २०१४ मध्ये हसीन जहांसोबत झाले होते. त्यांना आयरा ही मुलगी आहे. हसीन जहांचा हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न शेख सैफुद्दीनसोबत २००२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र त्यांचा घटस्फोट झाला. सैफुद्दीन आणि हसीन यांना दोन मुली आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.