वडिलांना पुरस्कार घेताना पाहून दीपिकाला अश्रू अनावर!

0

दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदूकोण यांना ‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया’ कडून जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आपल्या वडिलांना पुरस्कार घेताना पाहून दीपिका पदुकोणला आनंदाश्रू अनावर झाले.

यावेळी त्यांनी देशातील खेळाच्या स्थितीबाबत समाधान व्यक्त केले. मात्र प्रतिभावान खेळाडूंना योग्यवेळी आणि योग्य वयात पुरेशा सुविधा मिळाल्या तर दिग्गज खेळाडू तयार होतील, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रकाश पदुकोण यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी कुटुंबियांचे आभार मानले. हे सर्व ऐकून दीपिका भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.

‘बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया’ कडून जीवनगौरव पुरस्कार देण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा मान त्यांना मिळाल्याने त्यांच्यासाठी आणि कुटुंबियांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

यावेळी प्रकाश पदुकोण म्हणाले, बॅडमिंटनने आतापर्यंत जेवढी प्रगती केली आहे, त्यामुळे मी खूप आनंदी आहे. बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढली चालली आहे. त्यामुळे क्रिकेटनंतर बॅडमिंटन देशातील दुसरा लोकप्रिय खेळ झाल्याचे चित्र दिसत आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.