‘लोकांना भुलवून सत्ता मिळवणे पाप आहे’, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

0

मुंबईतील वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलात शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी सभा सुरू आहे. यात अनेक महत्त्वाचे ठराव आणि घोषणा केल्या आहेत.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘छाती किती इंचाची आहे हा प्रश्न नाही पण त्यात किती शौर्य आहे हे महत्त्वाचे आहे’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘गाईला मारणे पाप आहे, त्याप्रमाणेच जनतेला थाप मारणेही पाप आहे. थापा मारणे बंद करा. लोकांना भुलवून सत्ता मिळवने पाप आहे.’ असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्यांवर भाष्य करत भाजप सरकारवर तोफ डागली. यावेळी बोलताना त्यांनी नितीन गडकरींच्या नौदलाविरोधात वक्तव्यावर आक्षेप घेत नितीन गडकरींचं बोलणं ऐकून पायाची आग मस्तकात गेली असल्याचे ते म्हणाले. ‘नौदलात असलेले शौर्य तुमच्या 56 इंचाच्या छातीमध्ये नाही. इतकेच असेल तर सैनिकांचे फुकटचे श्रेय तुम्ही लाटू नका. दुर्दैवाने तुमचे सरकार आहे. सरकार म्हणून मस्ती दाखवता. राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा घुसला आहे’, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

आपल्या भाषणात त्यांनी चंद्रकांत पाटलांवरही घणाघाती टीका केली. त्यांच्या बेळगाव वक्तव्याचादेखील समाचार घेतला.
भीमा कोरेगाव घटनेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘कोरेगाव भीमा घटनेमागे अदृश्य हात आहेत. हे हात कोणाचे आहेत सर्वांना माहीत आहे. जेव्हा कधी हे हात सापडतील तेव्हा त्यांची होळी करू.’

भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना कशी टिकेल, याची चिंता माझ्या मनात कधीच नव्हती, ती आजही नाहीये. 1966 साली शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आणि त्यातील आजोबांचे भाषण आजही मला आठवते. दसरा मेळाव्याचे भाषण माँसाहेबांच्या मांडीवर बसून ऐकले होते, अशा अनेक आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल ते म्हणाले, घराणेशाही आणि घराण्याची परंपरा यात फरक आहे. या घराची पुढची पिढी मी तुमच्या सेवेत देतोय असेही ते म्हणाले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.