रेल्वेभरती गोंधळाविरोधातील आंदोलन मागे, साडे तीन तासानंतर मध्यरेल्वेची वाहतूक सुरु

0

तब्बल साडेतीन तास रेल रोको आंदोलन केल्यानंतर अॅप्रेंटिसच्या आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अॅप्रेंटिसच्या उमेदवारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

रेल्वेभरतीतील झालेल्या गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मध्य रेल्वे ठप्प केली आहेत. सकाळी ७ वाजेपासून अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे रोको करून आंदोलन सुरु केले. यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. रेल्वे अधिकाऱ्यांनी आंदोलनाची वेळेवर दखल न घेतल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले यामुळे दादरहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक तब्बल साडेतीन तास ठप्प होती.

रेल्वे प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला मनसे, शिवसेनेने पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनकांनी मार्ग मोकळा केला असून अप-डाऊन मार्गावरुन गाड्या सोडल्या जात आहेत. भायखळ्याहून आसनगावच्या दिशेने पहिली ट्रेन रवाना झाली आहे. तसेच माटुंग्यातून दोन्ही दिशेने रेल्वे रवाना, ठाण्यातूनही रेल्वे सुटली आहे.

यादरम्यान विद्यार्थ्यांना रेल्वे रूळावरून हटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने परिस्थिती जास्तच चिघळली होती. यात ६ ते ७ विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त समोर आले होते. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनीही लोकलवर दगडफेक केली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला होता. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत. सकाळी ७ वाजेपासून सुरु झालेल्या आंदोलनामुळे मुंबईकरांच्या कामावर जाण्याच्या वेळीच रेल्वे वाहतूक खोळंबल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. वाहतूक ठप्प झाल्याने मध्यरेल्वेच्या स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यावर तोडगा म्हणून बेस्टने कुर्ला, घाटकोपर, मुलूंड येथून जास्तीच्या गाड्या सोडून प्रवाशांना थोडासा दिलासा दिला.

अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांसाठी २० टक्के दिलेला कोटा रद्द करावा, रेल्वे जीएम कोट्यातून जशी भरती व्हायची तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असूनही त्या भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत. अॅप्रेंटिस विद्यार्थ्यांनी अनेक वर्षे काम करुनही जागा न भरल्याने हा पवित्रा घेतला आहे. देशभरातील विद्यार्थी आज मुंबईत आले. त्यांनी सकाळी सकाळीच रेल्वे बंद पाडल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे मांडल्या.

काय आहेत मागण्या?

* २० टक्के कोटा कायमस्वरुपी रद्द करण्यात यावा

* रेल्वे अॅक्ट अॅप्रेंटिस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी सामाविष्ट करण्यात यावे

* रेल्वे अॅप्रेंटिस झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना जीएम कोट्याअंतर्गत जुन्या नियमानुसार रेल्वेसेवत सामाविष्ट करावे, भविष्यातही हा नियम लागू ठेवावा

*याबाबत १ महिन्यात निर्णय व्हावा, कोणत्याही नियम आणि अटी लागू करु नये.

प्रशिक्षणार्थींची वेगळी परीक्षा घेऊ –

प्रशिक्षणार्थी यांची वेगळी परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय रेल्वेभरती बोर्डाने घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासाठी त्यांना ३० मार्चपर्यंत अर्ज करता येईल. मात्र अधिकृतपणे रेल्वे प्रशासनाने अद्याप याबाबत घोषणा केली नाहीये.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.