रॅगिंगचा धक्कादाय प्रकार, विद्यार्थ्याला पाजले विषारी औषध

0

नागपूर येथील शासकीय वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र टाकून रॅगिंग करण्याचा घाणेरडा प्रयत्न करण्यात आला आहे. विषारी बाटलीत मूत्र टाकून ते विद्यार्थ्याला पाजण्यात आले होते.

नागपूरच्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र विसर्जन करून त्याचे रॅगिंग करण्यात आले. विष्णू भारत पवार (२१, सेलू) असे या पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे. श्री आयुर्वेद कॉलेजमध्ये विष्णू बीएएमएसच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. या विद्यार्थ्याला विषारी बाटलीत लघुशंका करून त्याला पाजली. विष्णूला त्वरित उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.

विष्णू राहत असलेले वसतिगृह अजनी पोलिस ठाण्याच्या जवळच आहे. एका विद्यार्थ्यावर असे अत्याचार होत असताना अजनी पोलिसांनी हलगर्जीपणा केला. उशीरा या प्रकरणात गुन्हा दाखल केला गेला

विष्णू रात्री १०.३० वाजेच्या सुमारास मित्रासह वसतिगृहात गेला. त्यावेळी एका खोलीत वरिष्ठ विद्यार्थी रॅगिंग घेत असल्याचे समजले. रॅगिंगच्या भीतीपोटी विष्णू वसतिगृहाच्या बाहेरच फिरत राहिला. मध्यरात्री तो त्याच्या खोलीत गेला. विष्णू त्याच्या खोलीत आल्याचे विद्यार्थ्यांना समजले. त्यानंतर राहुल नावाच्या विद्यार्थ्याने त्याला उठवून खोलीत घेऊन गेला. त्यावेळी तिथे रंजित सरदार, प्रशील उचके, प्रवीण गेडाम, शुभम मडावी, राजू सलामे, देवेंद्र मडावी, तुकाराम बुरकुले यांच्यासह अनेक मुले होती. त्यांनी विष्णूला बेदम मारहाण केली. ‘मला मारू नका’ अशी विष्णू विनंती करत राहिला. मात्र त्यांनी ऐकले नाही. सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतर त्याला फिनाइल मिश्रीत मूत्र पाजले.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.