रिसेप्शनमध्ये विराट-अनुष्का दिसले ग्लॅमरस लूकमध्ये, सेलेब्ससह क्रिकेटर्सची मांदियाळी
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या लग्नाचे दुसरे वेडिंग रिसेप्शन 26 डिसेंबर रोजी मुंबईत पार पडले. लोअर परेल येथील सेंट रेगिंस या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शनची पार्टी रंगली. या रिसेप्शन सुरु होण्याआधी विराट आणि अनुष्का दोघेही मिडियासमोर आले. रिसेप्शनमध्ये अनुष्काने सोनेरी रंगाचा लहेंगा चोली परिधान केली होती. लहेंग्यासोबत अनुष्काने लाल चुडादेखील घातला होता. तसेच विराटने क्रिम रंगाच्या ट्राऊजरसोबत नेव्ही ब्लू कोट घातला होता.
बॉलिवूडमधील हे कलाकार होते उपस्थित
विराट-अनुष्काच्या रिसेप्शनला अमिताभ बच्चन, रेखा, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, प्रियांका चोप्रा, श्रीदेवी, माधुरी दिक्षीत, राणी मुखर्जी, करण जोहर, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, कंगना रनोट, रणबीर कपूर, दिग्दर्शक आणि निर्माता राजू हिरानी, विधू विनोद चोपडा, अभिनेता बोमन ईराणी, सैफ अली खानची मुलगी सारा व नीता अंबानीसह अनेक बॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी दिसली.
क्रिकेट विश्वातील या सेलिब्रिटींनी लावली हजेरी
टीम इंडियाचा माजी कोच अनिल कुंबळेनंही सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी, वीरेंद्र सहवाग, सौरभ गांगुली, त्यासोबतच माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर बुमरा, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादवसह अनेक क्रिकेट सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील रिसेप्शनसाठी अनुष्का आणि विराटने सुमारे 600 पाहुण्यांना आमंत्रित केले होते, असे सांगितले जाते. हे सेलिब्रेशन रात्री उशीरा तीन वाजेपर्यंत चालू होते. विराट-अनुष्काने पहिले रिसेप्शन गेल्या 21 डिसेंबर रोजी दिल्ली येथे दिले होते. या रिसेप्शन सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.