राहुल गांधींनी दिल्लीत घेतली शरद पवारांची भेट

0

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी (१४ मार्च) दिल्लीतील निवासस्थान भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तासभर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

उत्तरप्रदेश पोडनिवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गडातच भाजपचा पराभव झाला आहे. सपा-बसपाने एकत्र येऊन मिळवलेल्या यशामुळे विरोधकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. 2 दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी मेजवानीसाठी सर्व विरोधी पक्षांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात शरद पवारही उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्या या डिनर डिप्लोमसीनंतर राहुल गांधींनी संपर्क साध्यण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.