राज ठाकरे घेणार असलेली शरद पवारांची ‘ती’ मुलाखत पुन्हा रद्द

0

माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली मुलाखत पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे.

कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत रद्द कण्याचा आयोजकांनी निर्णय घेतला आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संमेलनानिमित्त ६ जानेवारी रोजी ही मुलाखत होणार होती. विशेष म्हणजे, यापूर्वीसुद्धा शरद पवारांच्या कार्यव्यग्रतेमुळे ३ जानेवारी रोजी होणारी ही मुलाखत रद्द करून ६ जानेवारी रोजी नियोजन करण्यात आले होते. पण अखेरीस ती पुन्हा रद्द झाली आहे.

६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पवारांची ही मुलाखत होणार होती. राज ठाकरे ती घेणार असल्यामुळे पुणेकर रसिक मोठ्या उत्सुकतेने या मुलाखतीची वाट पाहत होते. मात्र, आता ती अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही मुलाखत आता कधी होणार हे माहीत नसल्याने अनेकजण हिरमुसले आहेत. या मुलाखतीतून पवारांचे अनेक नवे पैलू उलगडले जातील, अशी अपेक्षा अनेकांना होती. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी ही माहिती दिली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.