राज ठाकरेंच्या सभेनंतर मनसेच्या कार्यकर्ते आक्रमक, गुजराती पाट्यांची केली तोडफोड

0

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसईत लावण्यात आलेल्या गुजराती पाट्यांची तोडफोड केली आहे.

त्या भागातील हॉटेल मालक, पोलीस प्रशासन तसेच महापालिकेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा याबाबत पत्रे दिली होती. परंतु या पत्रांना काहीच उत्तर न दिल्याने रविवारी (१८ मार्च) रात्री राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांच्या पाट्यांची तोडफोड केली. ही दुकाने गुजराती लोकांची होती, असे वृत्त समोर आले आहे. दुकानासोबतच गुजराती गाड्यांचीही तोडफोड केली आहे. वसई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कार्यकार्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.