राज ठाकरेंच्या टिकेला गडकरींचे लेखी उत्तर, कृष्णकुंजवर पाठवले पत्र

0

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतिर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टिका केली होती. या टिकेला नितीन गडकरी यांनी लेखी उत्तर पाठवले आहे.

सभेत बोलताना राज म्हणाले होते, की गडकरी कुठेही गेले की साबणाच्या पाण्याचे फुगे सोडल्यासारखे हिशोब सांगतात. इतके लाख खर्च केले, तितके कोटी खर्च केले. पैसेच नाहीतर खर्च कुठुन करतात, असा प्रश्न विचारत राज यांनी गडकरींती खिल्ली उडवली.

राज ठाकरे यांच्या टिकेला गडकरींनी उत्तराच्या स्वरुपात लेखी अहवाल ‘कृष्णकुंज’वर पाठवला आहे. या अहवालात सरकारने केलेल्या कामांची यादी देण्यात आली आहे. राज्यात केलेल्या रस्ते विकास कामांची ही यादी आहे. पाच लाख कोटींची कामे सुरु झाल्याचा दावा गडकरींनी आपल्या अहवालात केला आहे. त्यापैकी 4 लाख 27 कोटींच्या कामाची यादी देण्यात आली आहे. तसेच गडकरींनी पाठवलेल्या पत्रातून राज यांना थेट आव्हान केले आहे, ते म्हणाले, मी पाठवलेल्या कामांच्या यादीबद्दल शंका असेल तर शिवाजी पार्कवर जाहिर चर्चा करण्याची तयारी ठेवावी.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.