राज्यात प्लास्टिक बंदी, राज्य सरकारने जारी केली अधिसुचना

0

महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. शनिवारपासून या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश महानगरपालिका तसेच पोलिसांना देण्यात आले आहे. औषधांच्या वेष्टनासाठी, वन फलोउत्पादनासाठी आणि घनकचरा हातळण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक यातून वगळले आहे. तसेच ग्राहकांकडून प्लास्टिक जमा करून घेण्यासाठी प्लास्टिक कलेक्शन पॉइंट्स तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यापा-यांना आणि उत्पादकांना प्लास्टिकचे रिसायकल करण्याची सक्ती केली आहे.

गुढीपाडव्यापासून प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासून अधिसुचना जारी केल्या. राज्य सरकारने काढलेल्या अधिसुचनेनुसार, प्लास्टिक उत्पादक, व्यापारी तसेच ग्राहकांना एक महिन्यात प्लास्टिक नष्ट करावे लागणार आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.