राज्यातील पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
बेकायदा कॉल डिटेल्स रेकॉर्डस काढून विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये राज्यातील पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित (वय 55) यांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी (2 फेब्रुवारी) अटक केली.
याच प्रकरणात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चार गुप्तहेरांना अटक केली होती. कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआर प्रकरणात नागरिकांचे कॉल रेकॉर्ड गुप्तपणे काढले जात होते. त्यानंतर ते रेकार्ड विकत होत्या. दरम्यान, शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींच्या चौकशीत बेकायदा 177 सीडीआरची विक्री केल्याचा प्रकार समोर आला होता. हे नेमके कुणाचे सीडीआर आहेत, त्यांचा वापर कशासाठी केला जात होता आणि ते कुणाला पुरविले जात होते, याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली आहे.