राज्यसभेसाठी भाजपकडून राणे-जावडेकर-मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकरांचे नाव निश्चित

0

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एकूण ६ जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा (१२ मार्च) शेवटचा दिवस आहे. भाजपने ३ जागांसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि केरळचे भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांची नावे निश्चित केल्या आहेत.

काँग्रेसकडून कुमार केतकर यांचे नाव निश्चित – काँग्रेसच्या एका जागेसाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. रविवारी रात्री त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यापूर्वी शिवसेनेकडून अनिल देसाई, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण या विद्यमान खासदारांनी अर्ज दाखल केले आहेत.

राज्यसभेच्या एकूण ५८ जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील ६ जागा महाराष्ट्रामधून आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.