राज्यसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडून अनिल देसाई यांना पुन्हा संधी, उद्धव ठाकरे यांची घोषणा

0

राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.

अनिल देसाई हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्याची देसाई यांची संधी हुकली होती. २०१२ मध्ये डॉ. मनोहर जोशी यांची सदस्यपदाची मुदत संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना प्रथमच राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

एप्रिल-मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ही निवडणूक होत असून १६ राज्यातील एकूण ५८ जागांसाठी २३ मार्चला मतदान होईल.

हे सदस्य होणार निवृत्त –

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, जेपी नड्डा, मणिशंकर, काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, रेणुका चौधरी, राजीव शुक्ला, सचिन तेंडुलकर, रेखा हे सदस्य राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

महाराष्ट्रातून हे खासदार होणार निवृत्त –

राष्ट्रवादीच्या वंदना हेमंत चव्हाण, डी. पी. त्रिपाठी, काँग्रेसच्या रजनी पाटील,राजीव शुक्ला, भाजपचे अजयकुमार संचेती आणि शिवसेनेचे अनिल देसाई हे निवृत्त होत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.