राज्यभरात तणावपूर्ण शांतता, काही शहरांत आंदोलक आक्रमक

0

भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेनंतर आज (बुधवार, 3 जानेवारी) भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. ‘महाराष्ट्र बंद’ घोषणेला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत बेस्ट बस वाहतूक सुरळीत सुरू असून आज सकाळी काही कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केले आहे. ठाण्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

आज सकाळी काही शहरात दिसली. अनेकांनी खबरदारी म्हणून सकाळपासून दुकाने, मॉल बंद ठेवली आहेत. पुण्यातील शाळांना, काही कंपन्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून पुणे-बारामती बस सेवा बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदचे राज्यातील प्रमुख शहरात पडसाद उमटत आहेत. सर्वत्र पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद तिस-या दिवशीही राज्याच्या काही भागात उमटत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. भारिप, बहुजन महासंघ, महाराष्ट्र डेमोक्रॅटिक फ्रंट, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र लेफ्ट फ्रंटसह अनेक दलित व डाव्या संघटनांचा आजच्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर यांच्यासह शरद पवार, रामदास आठवले आदी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

– औरंगाबाद येथे खबरदारी म्हणून १२ तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद विद्यापीठाने पदव्युत्तर परीक्षा केल्या रद्द केल्या आहेत.
– पुण्यात काही भागात आंदोलकांनी वाहनांवर दगडफेक केली. तसेच मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी आंदोलन आक्रमक झाले. मात्र येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसला.
– मुंबईत डब्यावाल्यांनी सेवा आज बंद राहणार असून एसी लोकलच्या फे-या रद्द करण्यात आल्या आहेत.
– ठाण्यात आंदोलकांनी महामार्गावर बस थांबवले. विरारमध्ये रिक्षा, शाळा बंद, नालासोपारा आणि वसईमध्ये बंदला समिश्र प्रतिसाद आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गडचांदूर, कोरपना, गोंडपिंपरी, जिवती येथे कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
– वर्धा जिल्ह्यातील काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातही पूर्णपणे बंद पाळला जातो आहे.
– यवतमाळ शहरातील मार्केट व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून येथे एका शाळेच्या बसवर दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.