रहाणे नव्हे या खेळाडूमुळे वाढली विराट कोहलीची चिंता

0

भारतीय टीम दक्षिण आफ्रिकाला रवाना झाली आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच विराट कोहली तणावात आल्याचे दिसते. कोहलीच्या तणावाचे कारण अजिंक्य राहणे नव्हे तर शिखर धवन आहे. शिखर धवनच्या
टाचेला जखम झाली आहे.

ओपनर शिखर धवनच्या टाचेच्या दुखण्याने टीमचे तेन्सिओन वाढवले आहे. त्याच्या टाचेचे दुखणे बरे झाले नाही तर ५ जानेवारीपासुन सुरु होणाऱ्या सामन्यात त्याचे खेळणे कठीण होऊ शकते. भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी शिखर धवन थोडासा लंगडताना दिसला. त्याच्या डाव्या टाचेला पट्टी बांधलेली दिसली. सध्या फिजियो पॅटिक फरहार्ट त्याची देखरेख करत आहे. त्याचे एमआरआय स्कॅनदेखील करण्यात आले आहे. शिखर पहिला सामना खेळू शकेल कि नाही हे अध्याप सांगितले जाऊ शकत नाही. जर शिखर पहिल्या सामन्यात खेळला नाही तर केएल राहुल मुरली विजयसोबत ओपनिंगमध्ये उतरेल. चॅपियन्स ट्रॉफीमध्ये धवन सर्वाधिक रन्स बनवणारा खेळाडू ठरला होता.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.