या ५ पदार्थांत मध टाकून प्यायल्यास वजन झटपट होईल कमी
मधामध्ये अंटीऑक्सीडेंट्स, अंटीबॅक्टीरियल, अंटीफंगल आणि अंटी मायक्रोबायल हे गुण आढळतात. हे गुण शरीरासाठी लाभदायी असतात. मध जितके गोड असते तितकेच त्याचे फायदे जास्त असतात. आयुर्वेदाप्रमाणे मधाचे अनेक प्रयोग केले जाऊ शकतात. याचे नियमित सेवन केले जाऊ शकते. तसेच मधाचे विविधप्रकारे सेवन केले जाऊ शकते. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. आज आम्ही तुम्हाला मधाचे विविध पद्धती सांगत आहोत ज्यामुळे तुमचे वजन दुपटीने कमी केले जाऊ शकेल.
लसूण –
एक चमचा मधात दोन-तीन लसूणच्या पाकळ्या वाटून टाका. नंतर एक ग्लास कोमट पाण्यात हे मिश्रण टाकून प्या. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
ताक –
ताकत मध मिसळून प्यायल्यास शरीरातील मेटाबॉलीझम वाढेल. शरीर योग्यरीत्या कॅलरी खर्च करेल.
भोपळ्याचा रस –
एक ग्लास भोपळ्याचा रसात एक चमचा मध मिसळून प्यावे. यामुळे पोटावरची चरबी कमी होईल.
दालचिनी –
एक कप पाण्यात दालचिनी उकळून घ्यावी नंतर त्या पाण्यात एक चमचा मध टाकून प्यावे. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.
दुध –
एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून प्यावे, याने शरीरातील मेटाबॉलीझम वाढते व पोट कमी होते.