या कारणाने विराट लग्नाची अंगठी घालतो गळ्यात

0

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न 2017 वर्षातले सर्वाधिक चर्चेत राहिलेला विषय आहे. सध्या दोघेही दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आहेत. नुकताच विराटचा एक फोटो सोशल मिडियावर समोर आला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की प्रश्न पडेल, कि विराटने असे का केले असावे.

इन्स्टाग्रामवर एका पेजवर विराटचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये विराटने त्याच्या लग्नाची अंगठी गळ्यात घातलेली दिसत आहे. ‘सरावाला जाताना विराट आपल्या लग्नाची अंगठी गळ्यात घालतो,’ असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या सरावादरम्यान विराट प्रत्येकवेळी अंगठी चैनमध्ये अडकून गळ्यात घालतो. विराट अंगठी काढून ठेवण्याऐवजी गळ्यात घालणे पसंत करतो. त्याला फलंदाजी करताना अंगठीमुळे अडथळा निर्माण होत होता म्हणून त्याने अंगठी गळ्यात घालणे पसंत केले. या फोटोची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या साखरपुड्याचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता. यावेळी विराटने अनुष्काला तब्बल १ कोटीची अंगठी घातली होती असे सांगितले जाते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.