या एका भाजीने करू शकता वजन कमी
वांग्याचे भाजी, भरीत खायला अनेकांना आवडते. परंतु वांग्याचे आपल्या शरीराला किती फायदे आहेत याची क्वचितच लोकांना कल्पना असेल. वांगे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण वांग्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. जर वांगे योग्यप्रकारे खाल्ले तर त्याचे पोषक तत्व शरीराला मिळतात. भाजी व्यतिरिक्त वांगे कसे खाल्ले जाऊ शकतात आणि त्याचा शरीराला कसा फायदा होतो हे आज जाणून घेऊ या-
* वांगे एखाद्या धातूपासून बनलेल्या चाकूने न कापता स्टेनलेस स्टीलच्या चाकूने कापावे. यामुळे वांग्यात असलेल्या फोटो केमीकल्स आणि धातू यांच्यात होणाऱ्या रिअक्शनचा धोका नसतो.
* वांग्याचे नियमित सेवन केल्यास कॅन्सरचा धोका टाळतो.
* वजन कमी करायचे असेल तर वांग्याचा डाएटमध्ये समावेश करावा. यामुळे लवकर वजन कमी होते.
* वांगे कापून काहीवेळ मिठाच्या पाण्यात ठेवल्यास त्यातील कडवटपणा नाहीसा होतो.
* वांग्यात फायबर व एंटीऑक्सिडेंट्स असतात. फायबर शरीरात असलेले टॉक्सिन बाहेर टाकण्यास मदत करतात.