यामी गौतमचा पोल डान्स व्हिडिओ व्हायरल, पाहा तिचा अंदाज

0

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या पोल डान्सचे धडे घेत आहे. तिचा पोल डान्सचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिचे नवीन टॅलेंट समोर आले आहे. यामी या व्हिडिओमध्ये पोल डान्स करताना दिसत आहे. अगदी छोटासा हा व्हिडिओ अनेकांना थक्क करणारा आहे.

यामी आपल्या आगामी चित्रपटासाठी पोल डान्स शिकत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. आता यामी छंद म्हणून पोल डान्स करत आहे. तिच्या मते, तिला डान्सची आवड आहे. तसेच फिट राहण्यासाठी ती पोल डान्सचे धडे घेत आहे.

तसेच जॅकलीन फर्नांडिसदेखील पोल डान्स करते. ती नेहमी पोल डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. बॉलिवूडमधील खूप कमी अशा अभिनेत्रींना पोल डान्स येतो. त्या रांगेत आता यामीही येणार आहे.

यामी 2017 मध्ये ‘काबिल’ चित्रपटात हृतिक रोशनसोबत झळकली होती. तिचा ‘बत्ती गुल मीटर चालू’ हा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले असून ती शाहिद कपूरसोबत दिसणार आहे.

 

https://www.instagram.com/p/Bg6FAaznX_M/?hl=en&taken-by=yamigautam

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.