यंदा पडणार सरासरीएवढा पाऊस, स्कायमेट हवामान संस्थेचा अंदाज

0

यंदा देशात सरासरीएवढा पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेट खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100 टक्के पाऊस पडेल, असे स्कायमेटने सांगितले आहे. महाराष्ट्रात पावसाचा अंदाज चांगला आहे, असेही स्कायमेटने नमूद केले आहे. तसेच मराठवाड्यात दरवर्षीपेक्षा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक येथे सामान्य पाऊसमान असेल, असे सांगण्यात आले आहे.

येत्या जून महिन्यात सरासरीच्या 111 टक्के जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात 97 टक्के, ऑगस्टमध्ये 96 टक्के तर सप्टेंबर महिन्यात 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.