मैत्रीत ‘प्रेमाची’ फोडणी, सोनू के टिट्टु की स्विटी 

0

दिग्दर्शक : लव रंजन

कलाकार : कार्तिक आर्यन ,सोनू सिंग,नुशरत भरुचा,अलोकनाथ 

प्रकार : कॉमेडी, ड्रामा

रेटिंग : 3/5

सोनू के टिट्टु की स्विटी हा बहुचर्चित चित्रपट आज प्रदर्शित झाला.लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत होता,तो सिनेमातील गाण्यांमुळे, यातील गाणी ही चांगलीच प्रसिद्ध झाली होती.उत्तम संवाद,दिग्दर्शन,अभिनय या बाबतीत उजवा ठरलेला हा चित्रपट 2 तास 20 मिनीट प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवण्यास यशस्वी ठरतो.

ब्रदर फ्रॉम अनादर मदर अशी दोघामित्रांची म्हणजे सोनू अन् टिट्टुची मैत्री,प्रत्येकवेळा प्रेमात पडणारा टिट्टु आणि त्याला त्यातून वाचविणारा सोनू. वयाच्या 13 व्या वर्षांपासून सोबत असलेले हे दोघे मित्र,सोनू (कार्तिक आर्यन ) याला लग्न,कुटुंब या गोष्टींचा तिटकारा तर टिट्टु(सोनू सिंग ) ला या गोष्टींचे वेड, ब्रेकअप नंतर लव मॅरेज वरून विश्वास उडालेल्या टिट्टुला आता अरेंज मॅरेजवर भरोसा वाटायला लागतो .तेव्हा एंट्री होते नायिकेची अर्थात स्विटी (नुसरत भरूचा) ची टिपीकल सूरज बडजात्याच्या चित्रपटाप्रमाणे ही बहू त्यात आहे. सगळ्या कुटुंबाची काळजी घेणारी ही मुलगी टिट्टुला आवडते.सर्व जण लग्नाला राजी असताना सोनू ला सगळं चांगल कस यावर संशय येतो अन् सुरुवात होते,अनेक नाट्यमय घटनांना.पुढं काय होत ?प्रेम की मैत्री कोण जिंकते ?हे चित्रपटगृहात जाऊन पाहणेच योग्य ठरेल.

अभिनयाच्या बाबतीत विचार केला असता ,कार्तिक आणि नुसरत यांनी उत्तम अभिनय केला आहे .सोनू सिंगने देखील आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे .लक्षात राहणारा अभिनय आहे तो आलोकनाथ आणि वीरेंद्र सक्सेना या जोडीचा, थोड्या वेगळ्याच रंगात यावेळी आलोकनाथ दिसणार आहेत .दिग्दर्शन आणि संवाद ही देखील चित्रपटाची जमेची बाजू आहे.

चित्रपटातील गाणी उत्तम आहेत ,विशेषतःतरुणांना आवडणारी गाणी आहेत .दिल चोरी सड़ा हो गया ,छोटे छोटे पेग मारे,यार ही गाणी देखील उत्तम आहेत.बेकग्राउंड म्युजिक देखील श्रवणीय आहे. लोकेशन्स निवड अन् कॅमेरा वापर चांगला आहे.चित्रपटात अभाव आहे तो म्हणजे वास्तविकतेचा.एखादा मित्र जो आई आणि सासू सारखी काळजी घेतो.एवढ काही पटत नाही.सोनू आणि स्विटी यांच्यातील वाद हा सासू सूनांच्या भांडणासारखा दिसतो ज्यात सोनू हा हिंदी सिरियलच्या सासू सारखा अन् स्विटी बडजात्यांच्या सिनेमातील सुनेसारखी आहे.हे सगळं असल तरी हा चित्रपट एकदा पाहावा असा नक्कीच आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.