‘मुलीची छेड का काढली?’ विचारणा-या आई-वडिलांनाच आरोपीकडून बेदम मारहाण

0

‘मुलीची छेड का काढली?’ असा जाब विचारणा-या आई-वडिलांनाच आरोपीने जबर मारहाण केल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात घडली. रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेत तरुणीचे आई-वडिल गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उमरगामधील मळगी येथील एका 17 वर्षीय तरुणीची मागील एक महिन्यांपासून काही तरुण छेड काढत होते. याबाबत आई-वडिल त्या तरुणांना जाब विचारण्यास गेले असता त्यांना सळई आणि हंटरने बेदम मारहाण करण्यात आली. मुलीच्या आई-वडिलांनी या घटनेनंतर मुलीचे शिक्षण बंद करून गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.