मुलतानी मातीने दूर होतील केसांच्या या समस्या

0

त्वचेसाठी मुलतानी माती वापरताना तुम्ही नक्की पाहिले असेल किंवा तुम्ही मुलतानी माती वापरली सुद्धा असेल. परंतु केसांसाठी मुलतानी माती वापरली जाते हे कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल, पण हे खर आहे. मुलतानी माती केसांना अनेक समस्यांपासून दूर ठेवते. मुलतानी मातीमध्ये अॅल्युमिना, सिलिका आणि ऑक्साइडसारखे अनेक तत्व असतात. यामुळे केसांना पोषक तत्व मिळतात.

* रुक्ष केस मुलायम करण्यासाठी मुलतानी माती उपयोगी ठरते. त्यासाठी चार चमचे मुलतानी मातीत अर्धा कप दही, 5 चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे मध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावून थोडावेळ ठेवा. सुखल्यानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. त्यानंतर केसांना मुलायमपणा येईल केस आकर्षक दिसेल.

* दोन तोंडी केसांसाठी उपयोगी आहे मुलतानी माती
काही लोक दोन तोंडी केसांच्या समस्यांनी त्रस्त असतात. याचे कारण केसांचा कमजोरपणा आहे. मुलतानी मातीमध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे केस मजबूत होतात. दोन तोंडी केस असल्यास रात्री केसांना नारळाचे तेल किंवा बदामचे तेल लावून झोपा. सकाळी उठल्यानंतर ४ चमचे मुलतानी माती आणि ४ चमचे दह्याची पेस्ट बनवून केसांना लावा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग करा. काही दिवसांत दोन तोंडी केस नाहीसे होतील.

* केस सरळ करण्यासाठी उपयोगी आहे मुलतानी माती
केस सरळ करण्यासाठी सध्या अनेक हिटिंग हेअर स्ट्रेटनर्सचा प्रयोग केला जातो. त्यामुळे केसांवर परिणाम होतात आणि केस कमजोर होतात. परंतु मुलतानी मातीने केस सरळ केले जाऊ शकतात. त्यासाठी एक कप मुलतानी मातीत 5 चमचे तांदुळाचे पीठ आणि एक अंडा टाका. दोन्हीची चांगली पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावून कंगव्याने केस सरळ करा. पेस्ट सुखल्यानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. या पेस्टने केस सरळ होतील.

* केसात कोंडा असेल तर वापर मुलतानी माती
केसात कोंडा असेल तर मुलतानी माती त्यावरील फायदेशीर औषध आहे. त्यासाठी ४ चमचे मुलतानी मातीमध्ये थोडे दही मिसळावे आणि अंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावा. अंघोळ करताना केसांना थंड पाण्याने धुवा आणि कंडीशनर लावा. यामुळे कोंडा नाहीसा होतो.

* केस दाट करण्यासाठी लावा मुलतानी माती
धूळ आणि प्रदूषणाने केसांवर परिणाम होतात. यामुळे केस कमजोर होऊन तुटायला लागतात. मुलतानी मातीमध्ये अॅल्युमिना, सिलिका आणि ऑक्साइडसारखे अनेक पोषक तत्व असल्याने केस मजबूत होतात. मुलतानी मातीने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि डोक शांत राहते. त्यामुळे आठवड्यातून दोनवेळा मुलतानी मातीचा केसांसाठी वापर करावा. यामुळे केस दाट होतात आणि नवीन केस येतात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.