मुंबई हायकोर्टाने मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला
समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथे दंगल घडवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मिलिंद एकबोटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
मिलिंद एकबोटे यांनी पुणे सत्र कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु 22 जानेवारीला कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे एकबोटे हायकोर्टाची पायरी चढले. ‘पुणे कोर्टाने हिंदुत्ववादी संघटनांवर घेतलेल्या संशयाकडे दुर्लक्षित करता येणार नाही’ असे असे सांगून न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. भारती डांगरे यांनी मिलिंद एकबोटे यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.