मुंबईमध्ये ७ प्रवासी घेऊन जाणारे हेलिकॉप्टर बेपत्ता

0

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे पवनहंसचे डाऊफिन एएस 365 एन 3 हे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते.

या हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी जुहू इथून उड्डाण केले. हेलिकॉप्टर सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ओएनजीसीच्या समुद्रातील लॉन्चपॅडवर पोहोचणे अपेक्षित होते. मात्र समुद्रात 30 नॉटिकल मैल अंतरावर असताना हेलिकॉप्टरचा सकाळी 10.30 वाजता संपर्क तुटला.

तटरक्षक दलाने शोध मोहिमेला सुरुवात केली असून नौदलाच्या काही बोटी आणि विमाने डायव्हर्ट करुन हेलिकॉप्टरचा शोध घेण्यास सुरुवात झाली. जवळपास तीन ते चार तास शोध घेतल्यानंतर हेलिकॉप्टरचे काही अवशेष समुद्रात आढळल्याची माहितीदेखील समोर येत आहे. हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्यांचा शोध घेत आल्याचे सांगितले जात आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.