मुंबईत ‘विराट-अनुष्का’चा रिसेप्शन सोहळा, सेलेब्ससह क्रिकेटर्स लावणार हजेरी
मुंबईमध्ये 26 डिसेंबरला म्हणजे आज टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन आहे. यात खेळ, बिझनेस, फिल्म आणि राजकीय क्षेत्रातील तमाम दिग्गज हजेरी लावणार आहेत.
मुंबईपूर्वी 21 डिसेंबरला विराट आणि अनुष्का दिल्लीत रिसेप्शन दिले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर रोजी इटलीत अगदी खाजगी पद्धतीने लग्न केले. लोअर परेल येथील हॉटेल St Regis मध्ये बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे.
यात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, कतरिना कैफ, राणी मुखर्जी या कलाकारांसह इतर सेलेब्स सहभागी होतील. हॉटेलच्या गच्चीवर ही पार्टी आयोजित केली असून या पार्टीत 300 पेक्षा जास्त पाहुणे येणार असल्याचे कळते. रात्री 8 वाजता विराट-अनुष्का रिसेप्शन पार्टीला सुरुवात होणार आहे. क्रिकेट जागातील अनेक दिग्गज रिसेप्शनला हजेरी लावणार आहेत. या रिसेप्शनमध्ये सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी व युवराज सिंहसह अनेक क्रिकेटरचा येणार आहेत. तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह अनेक बिझनेसमन दोघांना शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत.