माधुरीने शेअर केला ‘बकेट लिस्ट’चा टीझर, पहिल्यांदाच झळकणार मराठी चित्रपटात

0

अभिनेत्रा माधुरी दिक्षित आता मराठी सृष्टीत पदार्पण करत आहे. ती ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 25 मार्च रोजी तिने ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचा टीझन लाँच केला आहे.

झी चित्र गौरव सन्मान सोहळ्यातही या चित्रपटाच्या टीझर लाँचसाठी माधुरी आली होती. ती यावेळी अगदी मराठमोठ्या अंदाजात दिसली.

माधुरी या चित्रपटात मधुरा सानेच्या भूमिकेत झळकणार आहे. ती आई, सून आणि पत्नी अशा विविध रुपात दिसणार आहे. माधुरी या चित्रपटातून कमबॅक असून तब्बल 4 वर्षांनंतर सिनेसृष्टीत येत आहे. यापूर्वी तिचे 2104 मध्ये ‘डेढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’ चित्रपट प्रदर्शित झाले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्कर करत असून सुमित राघवन, वंदना गुप्ते, रेशम टिपणीस यात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. माधुरीने या चित्रपटाचा टीझर टि्वटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

 

 

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.