महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा, आचार संहिता लागू
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (ता. 21 ) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदार होणार असून, २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. एकूण मतदारसंघ – २८८नुसूचित जाती – २९ अनुसूचित जमाती – २५ असा
असेल निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरण्याची मुदत ४ ऑक्टोबर, अर्ज मागे घेण्याची मुदत ७ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर, मतदान – २१ ऑक्टोबर, निवडणूक निकाल २४ ऑक्टोबर.
निवडणूक होणार रंगतदार देशात लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली होती. मतदारसंघांची चाचपणी, उमेदवारांची निवड यात राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते गुंतले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर, शिवसेना-भाजप युतीचे घोडे जागा वाटपात अडले आहे. युती झालीच तर, वंचित बहुजन आघाडी हा तिसरा भिडू निवडणूक रिंगणात असेल आणि युती फुटलीच तर निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.