महापौर नंदुशेटची पुन्हा ‘गडबड’ !

सिटी बस, एसटी आणि महानगर पालिका

0

सिटी बस, एसटी आणि महानगर पालिका

औरंगाबाद शहराची जागतिक नकाशावर जी ओळख आहे, ती अजिंठा, वेरुळची लेणी, दौलताबादचा किल्ला, बिबी-का-मकबरा यामुळे आहे. पण आणखी एक ओळख या शहराची जागतिक पातळीवर होती, ती म्हणजे या शहरात मीटरवर चालणारे रिक्षा होते आणि शहराची ‘लाईफ लाईन’ सिटी बस होती. ही ओळख होती,ती पुसून टाकण्यात इथल्या यंत्रणांचा मोठा हात होता. पण आता स्मार्ट सिटीच्या निमित्ताने या सार्वजनिक वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे घाई-घाईत घडबड आमच्या महापौर नंदुशेटनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी एकदाची ‘सिटी बस’ सुरु करून टाकली एकदाची !

काय आहे खरा प्रश्न?
औरंगाबाद शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर ना कधी एसटीच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास केला ना महानगर पालिकेच्या यंत्रणेने. त्यामुळे प्रश्न कधी सुटलाच नाही. तो कदाचित या यंत्रणेला सोडवायचाही नसेल. त्यामुळे त्यांनी हा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा प्रश्न लोंबकळत ठेवला. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बळकट करायची असेल तर पहिल्यांदा रिक्षांची सध्याची जी वाहतुक आहे त्यावर काही नियंत्रणे आणावी लागतील.
नियंत्रण
1. मिटरवरच्या रिक्षांची संख्या शहरात वाढवावी लागेल.
2. शहरात अवैध रिक्षांची संख्या जास्त आहे. ( एका परमीटवर किमान तीन आणि जास्तीत-जास्त पाच रिक्षा सध्या रस्त्यावरुन धावता आहेत.) त्यांच्यावर कारवाई करून वैध रिक्षांनाच शहरातून वाहतुक करण्याची परवानगी द्यावी लागेल.
3. काहीच मार्गावर सिटर रिक्षांनाच वाहतुकीची परवानगी द्यावी लागेल. ते मार्ग असे असावेत, ज्यामध्ये बसने वाहतुक करणे शक्य नाही.


4. ज्या मार्गावर प्रवासी संख्या अधिक आहे. उदाहरणार्थ चिकलठाणा ते वाळूज या मार्गावर फक्त सिटीबसच धावले.त्या मार्गावर रिक्षा किंवा सार्वजनिक वाहतुक करणारे इतर वाहन दिसणार देखील नाही.
5. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मिटर किंवा सिटर रिक्षांना परवानगी द्यावी.
6. शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी आरटीओ आणि वाहतुक पोलिसांनी महानगर पालिकेच्या (जो विभाग सध्या अस्तित्वात नाही,) अशा वाहतुक विभागासह संयुक्त कारवाई करावी. ही कारवाई शिस्त लावण्यासाठी असावी ना की ‘हात ओले’ करण्यासाठी.
7. काही दिवसांसाठी महानगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्याही कामासाठी ‘ब्रॅण्ड’ प्रमोशन म्हणुन सिटीबसचा वापर करावा.
8. ज्या मार्गावर ज्यावेळी जास्त गर्दी असते, त्या मार्गावर तातडीने जास्तीच्या गाड्यांची व्यवस्था करावी.
9. जशी मागणी तसा पुरवठा या तत्वांप्रमाणे लोकांना सिटीबसची सवय लागेपर्यंत विना टाईम टेबल ही सेवा द्यावी.
10. ज्या मार्गावर सिटी बस चालवायची आहे, त्या मार्गाचे एसटीने महानगर पालिकेला सर्वेक्षण करुन द्यावे.

एक काळ होता औरंगाबादची लाईफ लाईन होती सिटी बस. तो सुवर्ण काळ होता. 1995 पर्यंत जे विद्यार्थी होते. ते सिटी बसनेच प्रवास करीत होते. त्यापुर्वीचेही औरंगाबादमध्ये शिकणारी पिढी याच सिटी बसवर अवलंबून होती. नौकदारानाही याच सिटी बसचा सहारा होता. शहरात 110 ते 120 सिटी बस होत्या. रेल्वे स्टेशनला डेपो होता. शहरातल्या-शहरात नौकरी असल्याने एसटीत ज्या कामगार संघटनांचे ‘लिडरांनी’ सिटी बस मध्ये बदल्या करून घेतल्या. या नेत्यांनी पहिल्यांदा म्हणजे सिटी बस जोरात असतांना तिला ‘ब्रेक’ या नेत्यांनी लावला. वेळेवर गाड्या सोडण्याच्या ऐवजी या नेत्यांच्या मनावर गाड्या सुटल्या. परिणामी बस स्टाॅपवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांनी जी ‘शेअरींग’ रिक्षा सुरु केली. त्याची आत्ता ‘गदक’ लाईन रिक्षावाल्यांनी केली. तिथुनच लोकांचा सिटी बसवरचा विश्वास उडाला आणि सिटी बसऐवजी ‘गदक’ लाईनच्या रिक्षांवर नाईलाजाने ठेवावा लागला. त्याचवेळी जर महानगर पालिकेने लक्ष घालून सिटी बस सुरू केली असती तर परिस्थिती बदलली असती.

 

अकोला प्रवासी संस्थेने केला ‘धंदा’


औरंगाबाद महानगर पालिकेची खरी वाट लावली, ती आत्ता भाजपचे पदाधिकारी (पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते जेव्हा महापौर होते) आणि आयुक्त ‘गुप्त’ होते. त्यांच्याच काळात. त्याच कालावधीत अकोला प्रवासी संघटनेने औरंगाबादेत सिटी बस चालविली. पण या पुर्वाश्रमीच्या शिवसेना आणि आत्ताच्या भाजप पदाधिकाऱ्याने ‘धंदा’ करून घेतला. त्या ‘गुप्त’ आयुक्तांची साथ मिळाली. दोन वर्षात ती सिटी बस बंद पडली.

आता नंदूशेटसमोर आव्हान

महापौर नंदूशेट घोडेले यांनी गडबडीत (घाई-घाईत) सिटी बस सुरु केली खरी. पण त्यासाठीच्या मुलभुत पायाभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिल्यांदा महानगर पालिकेत परिवहन विभाग आणि त्याची समिती स्थापन करावी लागेल. सिटी बस लोकांना जास्त फायदेशीर आहे, हे दाखविण्यासाठी काही सोईसुविधा द्याव्या लागतील. कायम नवनवीन मार्गांचे सर्वेक्षण करुन त्या मार्गावर बस सुरू कराव्यात. ही सिटी बस औरंगाबादची ब्रॅण्ड व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर आपल्या शब्दाला जागणाऱ्या आणि दिलेला शब्द तडीस नेहणाऱ्या स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रित अभिवादनाचा स्विकार होइल. नाही तर नुस्तीच सिटी बसच्या उध्दघाटनाची चमकेगीर ठरेल.!

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.