मराठवाडा-विदर्भाला गारपिटीने झोडपले, पुढील 2 दिवस गारपिटीचा अंदाज

0

रविवारी मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीने झोडपले. यात पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मराठवाडा आणि विदर्भात अनेक तालुक्यांत झालेल्या गारपिटीमुळे 5 जणांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्याचे नामदेव शिंदे, जाफराबाद तालुक्यातील आसाराम जगताप आणि वाशिम जिल्ह्यातील यमुनाबाई हुंबड या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दर्यापूर तालुक्यातील गंगाधर कोकाटे यांचा वीज पडून मृत्यू झाला.

या गारपीटीमुळे रब्बी पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरबरा, द्राक्ष आणि संत्र्याला याचा मोठा फटका बसला. बोंड आळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातून कापूस गेला होता. रात्री आणि पहाटे झालेल्या वादळी वारा तसेच गारपिटीने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा या पीकांसह भाजीपाला, आंबा, द्राक्ष या फळबागांचेही नुकसान शेतकऱ्यांच्याना झेलावे लागत आहे. हातातोंडांशी आलेले पिक गारपीटीने उध्वस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

गारपिटीतील झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी खासदार रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत.

आणखी 2 दिवस गारपिटीचा अंदाज – 

मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील 2 दिवस म्हणजे 13 फेब्रुवारीपर्यंत वादळी वारे तसेच गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून साठवणूक करावी, असे आवाहन सरकारने केले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 3 दिवस गोंदिया, वर्धा, भंडारा, नागपूर, नांदेड, लातूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू शकते. पूर्व विदर्भात गारपिटीची शक्यता जास्त आहे. 11 व 12 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत वादळी वारे वाहण्याची व ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.