मनसेच्या गुढीपाडव्याच्या निमंत्रणात झाली मोठी चूक

0

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे विविध महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहेत. त्यामुळे या सभेची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे.

मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेचे निमंत्रण आतापर्यंत सर्वांना पोहोचले आहे. मनसेने अधिकृत फेसबुक पेजवरूनही याबाबत माहिती दिली आहे. पण हे निमंत्रण देताना मनसेकडून एक मोठी चूक झाली आहे. सभा संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत असताना सकाळच्या ५ ते ९ ची वेळ या निमंत्रणात देण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत पेजवर AM आणि PM चा घोळ झाल्याचे दिसते आहे. मनसेची ही चूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.