भोपळ्याच्या रसात आहेत गुणकारी फायदे, वाचा फायदे

0

आरोग्याच्या विविध आजारांसाठी आपण अनेक उपचार करतो. घरगुती उपायापासून डॉक्टरांकडे जाण्यापर्यंत अनेक पर्याय आपण निवडतो. परंतु आपण जेवणात भाज्या-फळ यांचा समावेश करत नाही, म्हणून आरोग्याच्या समस्या आपल्याला जाणवतात. अनेकदा भाज्या व फळांचा ज्यूससुद्धा आरोग्याला फायदेशीर असतो. दुधी भोपळ्याचा रसदेखील काहीसा असाच आहे. भोपळ्याची भाजी आवडत नसली तरी त्याचा रस आरोग्याला पौष्टिक आहे. आज जाणून घेऊया दुधी भोपळ्याचे अनेक फायदे…

केसांसाठी उपयोगी –
एक चमचा भोपळ्याच्या रसात 2 चमचे आवळा पावडर घालून मिसळून घ्या. हे मिश्रण केसांना लावा. 20 मिनिटांनी केस धुवा. असे आठवड्यातून 2-3 वेळा केल्याने केसांची वाढ चांगली होते.

चेहरा टवटवीत ठेवा –
एक चमचा भोपळ्याच्या रसात त्यात बेसन, दही व काकडीची पेस्ट घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स नाहीसे होऊन चेहरा तजेलदार दिसतो.

सर्दी-खोकल्यासाठी गुणकारी –
भोपळ्याचा एक चमचा रसात मध घालून हे मिश्रण प्या. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या दूर होईल.

उच्च रक्तदाबासाठी फायदेशीर –
भोपळ्यात कॅलरी आणि फॅटचे प्रमाण खूप कमी असते आणि डायटरी फायबर खूप जास्त असतात. भोपळ्यात 96 टक्के पाणी असते. यामध्ये लोह, ‘क’ जीवनसत्त्व आणि बी-कॉम्प्लेक्स मोठय़ा प्रमाणात असते. उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

बद्धकोष्ठतेवर फायदेशीर –
भोपळ्याच्या एक चमचा रसात मध घालून नियमित प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या नाहीसे होते.

मूत्रपिंडविषयक आजार होतील बरे –
भोपळ्यामुळे मूत्रपिंडविषयक आजार बरे होतात. ज्या लोकांना लघवी करताना जळजळ होते, त्यांनी जेवणात भोपळ्याचा समावेश करावा. तसेच भोपळ्याचा रस नियमितपणे घ्यावा.

होणार नाहीत अकाली केस पांढरे –
सकाळी उपाशी पोटी भोपळ्याचा रस प्यायल्यास अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होते.

शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रणात –
एक ग्लास भोपळ्याच्या रसात थोडेसे मीठ घालून सेवन केल्याने शरीरातील सोडियम नष्ट होणार नाही. शरीरात सोडियमची पातळी कमी असल्याने थकवा जाणवतो आणि खूप तहान लागते.

अनिद्रेची समस्या होईल दूर –
भोपळ्याच्या रसात तिळाचे तेल मिसळून त्याने झोपण्यापूर्वी डोक्याची मालिश करावी. यामुळे अनिद्रेची समस्या दूर होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.