भोकरदन-सिल्लोड रोडवर भीषण अपघात, 3 तरुण जागीच ठार

0

भोकरदन-सिल्लोड रस्त्यावर मालखेडा पाटीजवळ दोन दुचाकींच्या धडकेत 3 तरुणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत.

सिल्लोडच्या शिवना येथील जितेंद्र रतन जगताप (21), राहूल एकनाथ जगताप (22), राहूल सदाशिव जगताप (22) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नाव आहे. तसेच दुस-या दुचाकीवरील शुभम बाबुराव तळेकर आणि प्रज्वल फुसे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात भोकदन-सिल्लोड रोडवर गुरुवारी (29 मार्च) सायं. 5 वाजता झाला.

जितेंद्र रतन जगताप (21), राहूल एकनाथ जगताप (22), राहूल सदाशिव जगताप (22) हे दुचाकीने भोकरदनकडून सिल्लोडकडे जात होते. तसेच शुभम बाबुराव तळेकर आणि प्रज्वल फुसे सिल्लोडहून घरी जात होते. त्यावेळी दोन्ही बाजूच्या दुचाकी एकमेकांना जोरात धडकल्या. यात जितेंद्र रतन जगताप व राहूल सदाशिव जगताप हे दोघे जागीच गतप्राण झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गंभीर जखमी असलेल्या राहूल एकनाथ जगतापला औरंगाबादला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. शुभम बाबुराव तळेकर आणि प्रज्वल फुसे यांच्यावर भोकरदन येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची तक्रार भोकरदन पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या राहूल एकनाथ जगतापचे 1 एप्रिल रोजी लग्न होते. तो स्वत:च्या लग्नपत्रिका वाटण्यासाठी मित्रांसोबत गेला होता. मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.