भीमा काेरेगाव : निषेध आणि काही नाेंदी

0

भीमा काेरेगाव : निषेध आणि काही नाेंदी

सतीश देशपांडे ( सामाजीक अभ्यासक ) :

भीमा काेरेगाव इथं जी दगडफेक झाली ती निंदनीयच आहे. या घटनेचा अहिंसक पद्धतीनं निषेध नाेंदविणं हे प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्यच आहे. भीमा काेरेगाव इथं दाेनशे वर्षांपूर्वी झालेल्या लढाईची नाेंद आधुनिक भारताचे इतिहासकार बिपन चंद्र, सरकार, तसेच मध्ययुगीन भारताचा इतिहास लिहिणारे सतीश चंद्र यांनीही आपल्या पुस्तकांतून घेतली आहे. (वाचकांनी ती जरूर वाचावी.) या एेतिहासिक घटनेला सामाजिक संदर्भ आहेत हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लिखाणातून दाखवून दिले. हे सामाजिक संदर्भ मान्य असणारी व मान्य नसणारी मंडळी तेव्हाही हाेती आणि आजही आहेत.

या लढाईसंदर्भात आपापल्या परिनं परस्परभिन्न विचारांची मंडळी आपला विचार व्यक्त करत असतात. भिन्न भिन्न मतं मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असं मान्य असणाऱ्या लाेकशाही देशात आपण राहताे आहाेत. वादसंवाद प्रिय भारताची ही एक परंपराच आहे. या परंपरेला आता गालबाेट लागत आहे. संवाद फारसा हाेतच नाही, हाेतात ते फक्त वादच, आणि या वादाचे स्वरूप असते हिंसक. याचेच उदाहरण आपण आता अनुभवताे आहाेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही नाेंदी इथं कराव्याशा वाटतात-

१- इतिहासाचं स्मरण जरूर करावं, पण उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला भरीव काम करायचं आहे याचं विस्मरण व्हायला नकाे. आज असं दिसतय की, इतिहासाचं आेझं कुणालाच आपल्या खांद्यावरून खाली ठेवायला नकाे आहे.

२- आपल्या भूमिका संयमाने मांडाव्यात, टाेकाच्या भूमिका टाळाव्यात हे मान्य करणारी सम्यक मंडळी फार थाेडी उरली आहेत. सदासर्वकाळ टाेकाचं राहून कुणाचच भलं हाेणार नाही. ३- सद्ध्या काैटिल्याचं नाव सरकार दरबारी अनेकदा घेतलं जातं. पण काैटिल्यानं सांगितलेल्या राजधर्माचं काय ?

४- कुणीचं कुणाला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू नये. यातून साध्य काहीच हाेणार नाही. नुकसान हाेणार ते सामान्य माणसाचं.

५- घटना घडून जाते, निषेध हाेतात, जाळपाेळ हाेते, दंगा हाेताे, नि दाेन चार महिन्यांनी फाईल क्लाेज हाेते. ही घटना घडवून आणणारे मास्टर माईंड हाती लागतच नाहीत. म्हणून या परिस्थितीत या घटनेकडं गंभीरपणे पाहायला हवं. आपल्या कृतींचा राजकारणासाठी कुणी गैरवापर तर करणार नाही ना, याचं भान ठेवायला हवं.

६- हातातल्या साेशल मीडियाचा वापर थाेडातरी विवेकानं करायला हवा. … हे तूर्तास सांगावेसे वाटलेले काही मुद्दे हाेते. ही चर्चा अशीच चालू ठेऊ यात, पण प्रथम आपल्या आजूबाजूचं वातावरण शांत करू यात.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.