भारतीय क्रिकेट संघ तब्बल 10 वर्षानंतर आयर्लंडविरुद्ध खेळणार सामना

0

भारतीय क्रिकेट संघाच्या 2018 मधील कार्यक्रमात बदल केला आहे. यामुळे भारतीय संघ तब्बल 10 वर्षानंतर आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आयपीएल-2018 नंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार होता, मात्र आता या दौऱ्याआधी टीम इंडियाचा आयर्लंड दौरा आखला आहे. भारतीय संघ जून महिन्याच्या शेवटी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन टी-20 सामन्यांची छोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने बुधवारी (१० जानेवारी) एक पत्रकातून याविषयी माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघ 10 वर्षानंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे.

या दौऱ्यानंतर भारतीय संघ जुलैमध्ये इंग्लंडच्या दौरा करणार आहे. तिथे तीन टी-20, तीन वनडे आणि पाच कसोटी सामन्यांची मोठी मालिका खेळणार आहे.

भारताने 2007 साली आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी एक वनडे सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला होता. 2009 साली टी-20 विश्वचषक मालिकेत नॉटिंगहममध्ये भारत विरुद्ध आयर्लंडचा सामना झाला होता.

आता तब्बल 10 वर्षांनी भारत आयर्लंडमध्ये टी-20 मालिका खेळणार आहे. 27 आणि 29 जूनला हे दोन सामने खेळविण्यात येणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.