भारताच्या खात्यात दुसरे सुवर्णपदक, वेटलिफ्टर संजिता चानूचे मारली बाजी

0

राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारताने वेटलिफ्टिंगमध्ये दुस-या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात दुसरे सुवर्णपदक भारताला मिळवून दिले आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एक रोप्य पदक पटकावले आहे. संजिताने 192 किलो वजन उचलून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

संजिता चानू ही मूळची मणिपूरची आहे. 2014 मध्ये ग्लासगोमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पहिले सुवर्णपदक मिळवले होते. संजिता भारतीय रेल्वे कर्मचारी आहे.

गुरुवारी 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 196 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे. गुरुराजाने रौप्यपदक पटकावून भारताचे खाते उघडले होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.