भारताचा वनडेत दणदणीत विजय, विराट कोहलीचे शतक

0

पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताचा 6 विकेट्सने विजय झाला. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे
भारताच्या विजयाचे मानकरी ठरले. या मैदानावरचा भारतीय संघाचा हा पहिलाच विजय आहे. विराट कोहलीने शतक
ठोकले आहे. विराटच्या कारकिर्दीतले हे 33 वे शतक आहे. या खेळीत अजिंक्य रहाणेने ही विराटला उत्तम साथ दिली.
रहाणेने 86 चेंडूत 79 धावा काढल्या. रहाणेच्या यात 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले. विराटने 119 चेंडूत 112 धावा
काढून चांगली खेळी खेळली. विराटच्या या खेळीत 10 चौकारचा समावेश होता.

दक्षिण आफ्रिकेने भारताच्या 270 धावांचा पाठलाग करत असताना रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या रुपाने दोन धक्के
लागले. रोहित 20 धावांवर तर धवन 35 धावांवर बाद झाले.

कुलदीप यादवने वनडे सामन्यात धारदार गोलंदाजी केली. त्याने 10 षटकांत 34 धावा देऊन दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंना तंबूत पाठवले. त्याने ड्युमिनी (12), मिलर (37) व मोरिसला (27) आऊट केले. यजुवेंद्र चहलने दोन विकेट घेऊन सामन्यात चांगलाच चमकला.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डिकॉक (34) व हाशिम आमला (16)
यांनी दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, मात्र, बुमराहने ही जोडी फोडून फलंदाज आमलाला तंबूत पाठवले. आमलाने
17 चेंडूंत एक चौकार आणि 16 धावा काढल्या.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.