भाजपला गोपीनाथ मुंडेंचा विसर, मेळाव्याच्या बॅनरवर फोटोच नाही

0

भापजच्या आज वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईच्या बिकेसी मैदानावर भाजपने महामेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्याला भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. मात्र या कार्यक्रमाला गालबोट लागले. महामेळाव्याच्या बॅनरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा फोटो टाकला नाहीये, त्यामुळे मुंडे समर्थकांनी गोंधळ घातला. महामेळाव्याच्या व्यासपिठावर अनेक कार्यकर्त्यांचे फोटो आहेत, पण यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नसल्याने मुंडे समर्थकांनी एकच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करूनही गोंधळ शांत झाला नाही. यावेळी पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या दोन्ही बहिणींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. भाजपला महाराष्ट्रात तळागाळापर्यंत नेणा-या गोपीनाथ मुंडेचा भाजप पक्षाला इतक्या लवकर विसर कसा पडू शकतो, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.