बोनी कपूर यांनी लिहिले भावूक पत्र, श्रीदेवींच्या ट्विटर हँडलवरुन केले शेअर

0

मागील आठवड्यात म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी रात्री प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईमध्ये निधन झाले. त्यानंतर कपूर कुटुंबावर तर दु:खाचा डोंगर कोसळला तर सिनेसृष्टीसह जगभरातील चाहते दुखत बुडाले. जान्हवी आणि ख़ुशी यांच्यावरील आईचे छत्र हरवले. बुधवारी श्रीदेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पती बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या ट्विटर हँडलवरुन एक पत्र ट्वीट केले आहे. या भावूक पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बोनी कपूर यांनी लिहिलेले पत्र…
‘आम्हाला आधार देणारे माझे कुटुंबीय, मित्र परिवार, सहकारी, हितचिंतक आणि श्रीदेवी यांच्या असंख्य चाहत्यांचा मी आभारी आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो की, अर्जुन आणि अंशुला यांचे प्रेम खुशी, जान्हवी आणि माझ्यासोबत आहे. आम्ही एकत्रितपणे या दु:खाला सामोरे गेलो. जगासाठी श्रीदेवी एक ‘चांदनी’ होती. एक सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार अभिनेत्री होती. परंतु माझ्यासाठी ती प्रेयसी, मैत्रीण आणि माझ्या मुलींची आई होती. माझी सहचारिणी होती. माझ्या मुलींसाठी तर ती सर्वकाही होती. त्यांचे आयुष्य होती. ती आमचे जग होती. आमचे कुटुंब तिच्याभोवती फिरत असायचे.

श्रीदेवीला निरोप देताना तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की, आमचे दु:खं आम्हाला वैयक्तिकरित्या व्यक्त करु द्यावे. ती एक अशी अभिनेत्री होती, कि तिला पर्याय नाही. कुठलाच कलावंत पडद्याआड जात नाही, तो चंदेरी पडद्यावर चमकत राहतोच.

माझ्या मुलींचा सांभाळ करणे, सध्या माझे प्राधान्य आहे आणि श्रीदेवीशिवाय पुढे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. ती आमचे आयुष्य होती, ताकद होती आणि कायम हसतमुख राहण्याचे कारण होती. तिच्यावर खूप प्रेम करत होतो.

रेस्ट इन पीस, माय लव्ह. आमचे आयुष्य आता पहिल्यासारखे कधीच नसेल.’
– बोनी कपूर

या पत्रातून त्यांनी चाहत्यांसह सर्वांनाच आवाहन केले आहे की, ‘दु:खातून बाहेर पडण्यासाठी आमच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करावा.’

 

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.