बीडमधील उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी १४ जणांना बजावली नोटीस

0

केज येथील गटसाधन केंद्रातील १० वी आणि १२ वीच्या उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गट शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेजबाबदार धरून ही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करून तो शासनाकडे सादर केला जाणार आहे. 

गटसाधन केंद्रातील दहावी आणि बारावीच्या गणित विषयाच्या उत्तरपत्रिकांना शनिवारी (३ मार्च) रात्री ७.३० वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात जवळपास १३०० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. रविवार (४ मार्च) बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे यांनी गटसाधन केंद्राची पाहणी केली. दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका सील करून त्या कपाटात ठेवणे गरजेचे होते, परंतु गटशिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाने उत्तरपत्रिका जाळून खाक झाल्या. याला जबाबदार धरून गटशिक्षणाधिकारी बळीराम ढवळे यांच्यासह १४ जणांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.