बीट खाल्ल्यास वजन होईल कमी, हे फायदेही होतील

0

बीट हे असे फळ आहे, जे खाल्ल्यास तुम्हाला अनेक फायदे होतील. तुम्ही जर डाएट करत असाल तर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये बीटचा सामावेश करा. बीट तुमचे शुगर लेवल नियंत्रित करते. तुम्ही बीटचा रस पिऊ शकता किंवा त्याचा हलवा देखील करू शकता. बीटचे शरीराला अनेक फायदे आहेत, जाणून घेऊया बीट खाण्याचे फायदे…

* कॉलेस्ट्रॉल कमी करते –
बीटमध्ये फायबर, बेटासायनिन, फ्लोवेनॉइड्सचे मोठे प्रमाण असते. हे एक शक्तिवर्धक अंटीऑक्सिडेंट आहे. यामुळे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे ऑक्सिकरण कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी करते.

* गर्भवती महिलांसाठी फायदेशीर –
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फॉलिक अॅसिड उपलब्ध असते. या पोषक तत्वामुळे गर्भवती महिलेला त्याचा फायदा होतो. यामुळे गर्भवती महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांना उर्जा मिळते.

* मधुमेहावर नियंत्रण –
जे लोक मधुमेहाने त्रस्त आहेत, त्यांनी बीट खावे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहते. कारण मधुमेह असणा-यांची गोड खाण्याची इच्छा बीट खाल्ल्यास पूर्ण होऊ शकते. यात ग्लाइसेमिक इंडेक्स व्हेजिटेबल असते. यात कॅलरी जास्त असल्या तरी ते फॅट फ्रि असते.

* थकवा होतो दूर –

बीट थकवा दूर करण्यास मदत करतो. यात असलेले नायट्रेट तत्व धमन्यांचा विस्तार करण्यास मदत करतात. त्यामुळे शरीराला पूरेसे ऑक्सिजन मिळते आणि शरीराची उर्जा वाढते.

* बीटमुळे वाढते सेक्शुअल हेल्थ –
बीटमध्ये मोठ्या प्रमाणात बोरॉन केमिकल असते, त्यामुळे ह्यूमन सेक्स हार्मोनच्या निर्मितीसाठी मदत होते. बीटला नैसर्गिक वियाग्रा म्हणतात. पूर्वी याचा वापर यौन स्वास्थ वाढवण्यासाठी केला जात असे.

* कॅन्सरसाठी उपयुक्त –
बीटमधील बेटासायनिन तत्वामुळे कॅन्सरवर बराच आराम मिळतो. एका संशोधनानुसार, ज्यांना ब्रेस्ट किंवा प्रोटेस्ट कॅन्सर आहे, त्यांनी जर बीट खाण्यास सुरुवात केली तर त्यांचा ट्यूमर वाढण्याची गती 12 टक्क्यांनी कमी होते.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.