बीएमसीचे अर्थसंकल्प सादर, मुंबईकारांना दिलासा

0

2018-19 या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात मुंबईकारांना दिलासा मिळाला आहे. हे अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) सादर केला. त्यांनी 27 हजार 258 कोटीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीला सादर केला. विद्यमान करात कोणतेही वाढ न करता कोणतेही नवे प्रस्तावित कर लागू केले नाहीत. तसेच मुंबईतील पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर राहील असे तरतूदीवरून दिसत आहे.

* मुंबईतील कोस्टल रोडसाठी 1500 कोटी रूपयांची तरतूद केली आहे.
* मुंबईतील रस्ते कामांसाठी 1202 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
* गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 100 कोटींची तरतूद आहे.
* खड्डे बुजविण्यासाठी खास प्लॅंट उभारला जाणार आहे.
* पावसाळ्यात ड्रेनेजमध्ये पाणी तुंबणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत.
* ओसी नसलेल्या पुनर्वसित इमारतींना जलजोडणी दिली जाईल.
* नविन विकास आराखडा अंमलबजावणीसाठी 2665 कोटींची तरतूद केली आहे.
* मिठी नदीच्या सुधारणेसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद.
* महानगर पालिका रूग्णालयातील शुल्क वाढणार आहे. तसेच कारखाना परवाना शुल्क, घाऊक बाजार यांचेदेखील शुल्क वाढणार आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.