बिग बींच्या प्रकृतीत बिघाड, उपचारासाठी डॉक्टर जोधपूरला रवाना

0

महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड झाली आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपटाचे शुटींग करत असताना बिग बींची तब्येत अचानक बिघडली. बिग बींनी पहाटे ३ वाजेपर्यंत शुटींग केले.

बिग बी सध्या जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी चार्टर विमानाने मुंबईहून १० डॉक्टर जोधपूरला रवाना झाले आहेत. बिग बींनी पहाटे ५ वाजता ब्लॉगवर लिहिले होते, कि थोडी तब्येत बिघडली आहे. त्यानंतर ते पुन्हा शुटींगसाठी निघून गेले. ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ चित्रपटाशिवाय अमिताभ बच्चन ‘102 नॉट आउट’ चित्रपटाचे शुटींग करत आहेत.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.