बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर बनतोय चित्रपट, नवाझुद्दीन मुख्य भूमिकेत

0

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर तयार होणाऱ्या ‘ठाकरे’ या चित्रपटाचा थाटामाटात टीझर लॉच करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित या चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरचे लॉचिंग केले. या चित्रपटात नवाझुद्दिन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिंदी भाषेत बनणाऱ्या या चित्रपटाचे नाव ‘ठाकरे’ असे आहे.

राज्यसभेचे खासदार व शिवसेना नेते संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अभिजीत पानसे दिग्दर्शक असणार आहेत. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली असून त्यांना यासाठी चार वर्ष लागली आहेत.

अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार असे सांगितले जात होते मात्र तसे होऊ शकले नाही. अजय देवगणपूर्वी अक्षय कुमार आणि इरफान खान यांच्या नावाचादेखील विचार झाला होता. यापूर्वी स्मिता ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या विरोधानंतर हा चित्रपट बनला नाही.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.