बीड : नारायणगड शिक्षण प्रसारक मंडाळाचे कोषाध्यक्ष पिराजी पाटील सुर्वे (वय ९२) यांचे बुधवारी (ता. १६) रात्री पालवण चौकातील राहत्या घरी निमोनिया या आजाराने निधन झाले. सुर्वे पाटील हे बीड जिल्ह्यातील जुन्या पिढीतील दिग्गज राजकारणी स्वर्गीय बलवंतराव कदम, स्वर्गीय खासदार केशर काकू क्षीरसागर, माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, माजी आमदार जगताप यांच्या सोबत बीड जिल्ह्याच राजकारण हकत असतं. विशेषत: त्यांचा बीड विधानसभा मतदारसंघात खास दबदबा होता. मात्र ते प्रत्यक्ष कोणतीही निवडणूक लढले नाहीत. बालाघात डोंगर पट्ट्यातील ढाण्या वाघ म्हणून ते सर्वत्र परिचीत होते. त्यांना लोक पाटील आणि बप्पा नावाने ओळखत.
पिराजी पाटील सुर्वे आणि स्वर्गीय जिल्हा परिषद अध्यक्ष बलवंतराव कदम या दोन मित्रांनी मिळून स्थापन केलेल्या नारायणगड शिक्षण प्रसारक मंडाळाच्या शिवाजी विद्यालयाने बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात मोलाची भर टाकली. आजही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिवाजी विद्यालयाचे नावाचे गौरवाने घेतले जाते.
१९७२ च्या भीषण दुष्काळाचे नाव निघाले तरी अंगावर काटे येतात. अजुन ही जुणे जाणते लोक हादरून जातात. त्या भीषण दुष्काळात अनधान्याचा प्रचंड तुटवाडा होता. भाकरीच्या एका घासासाठी लोक तरसत होते. सरकार वेळेवर धान्य पुरवठा करू शकत नव्हते. अशा परिस्थीतीत पिराजी पाटील सुर्वे यांनी स्वत:च्या कणग्या (धान्य साठवण्याचे कोठार) भुकेल्या लोकांसाठी खुल्या केल्या होत्या. स्वत:च गाव असलेल सुर्याचीवाडी गावासह, करचुंडी, लिंबागणेश, देवऱ्याचीवाडी, खंडाळा, भाळवणी, मांडवजाळी, पिंपवाडी, कदमवाडी, पोखरी, माजरसुंबा, कोल्हारवाडी, वडगाव, जाधवाडी, बागुलदरा, वरवटी, धानोरा, फुकवाडी, महाजनवाडीसह जवळपास २५ ते ३० गावातील गोर गरीब, विविध जाती, धर्माच्या लोकांना धान्य पुरवठा केला. यागावात आजही त्याच्या धान्यामुळं जगलेली अनेक लोक आहेत. ते त्या भीष्ण दुष्कळातील आठवणी निघाल्या की आवर्जून सुर्वे पाटलांचे नाव मोठ्या आदरानी घेतात. १९७२ च्या भीषण दुष्काळात जगवलेले हजारो लोक त्यांच्या जाण्याने आज पोरके झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थीत राहु न शकल्याने हळहळ व्यक्त करीत आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री शिवाजीराव पंडीत, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार अमरसिंग पंडित, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार सुनिल धांडे, माजी आमदार जनार्धन तुपे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, भाजपाचे रमेश पोकळे, नारायणगड शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष दिनकर कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, मकरंद उबाले, बबनराव गवते, जनसंपर्क अधिकारी सुधाकर चिमणे, विलास बडगे, निवृत्ती डोके, आजीनाथ आदमाने यांनी सुर्वे पाटील यांच्या निधनावर दुख व्यक्त केले. काहीनी मोबाईलवर कुटूंबीयांशी संपर्क साधुन दु:ख व्यक्त केले तर काहींनी प्रत्यक्ष कुंटुंबीयाची भेट घेतली.
त्यांच्या पार्थीवावर त्यांचे जन्मगाव सुर्याचीवाडी (ता. जि. बीड ) येथे गुरुवारी ( ता.17) अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या मुलांने त्यांना मुखअग्नी दिला. कोरोना संकटामुळे मोचक्याच नातेवाईकांच्या उपस्थीतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकचे अधिकारी आसाराम सुर्वे तसेच सुन, नातू, नाती, मुली, पुतने, जावाई असा मोठा परिवार आहे.
|
|
|
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post
Loading...