बापू बिरु वाटेगावकर यांचे निधन

0

सांगली – इस्लामपूर येथे बापू बिरु वाटेगावकर यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर आध्यत्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचे काम त्यांनी केले.

नव्वदीनंतरही प्रकृती अगदी ठणठणीत, वाणी खणखणीत, बुद्धी शाबूत असणाऱ्या बापू बिरू यांच्यावर जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. दणकट अंगकाठी, झुपकेदार मिशा, डोक्यावर पटका, खांद्यावर घोंगडे आणि हातात तळपती फरशी कुर्हाड ही त्यांची ओळख होती.

बापु यांनी कृष्णा खोर्‍यात गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात आवाज उठवला होता. बोरगाव रेठरे हरणाक्ष, मसुचीवडी, ताकारी परिसरात त्यांची दहशत होती. बापू बिरू वाटेगावकर सुमारे २० ते २५ वर्षे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. २५ वर्षे सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये राहून त्यांनी गरीबांना मदत केली. या गुन्ह्यांसाठी त्यांनी शिक्षाही भोगली.

बापुंना गरीबांविषयी विलक्षण कळवळा होता. बापूंचे वाळवा तालुक्यातील बोरगाव हे गाव. याच गावातल्या एका गरीब कुटुंबातला बापूंचा जन्म झाला होता. बापूंना लहानपणापासून कुस्तीची आवड होती. याच बोरगावात रंगा शिंदे गोरगरिबांना त्रास देत होता. गावातील स्त्रियांची भर रस्त्यात छेड काढत होता. लोक रंग्याला घाबरत होते. गावकऱ्यांनी बापूला रंग्याचा बंदोबस्त करायला सांगितले. एक दिवस बापूंनी रंगा शिंदेला संपवला. रंग्याच्या भावाने बापूला खलास करेन असे म्हंटले. ही बाब बापूंच्या कानावर गेली असता त्यांनी रंग्याच्या भावाचाही कायमस्वरूपी बंदोबस्त केला.

गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी बापूंच्या हातून तब्बल बारा खून झाले. त्यानंतर बापू पंचवीस वर्षे फरार राहिले. पोलिसांनी बापूंच्या घरच्या लोकांना खूप त्रास दिला.

Loading...

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.